Friday, 23 September 2016

अनियमित पाणीपुरवठ्यासाठी नागरिकांचे आंदोलन

पुणे  : गेल्या अनेक वर्षांपासून संगमवाडी गाव व शाहदावल बाबा परिसरात अनियमित पाणी पुरवठा होत असल्याने तेथील नागरिकांनी अखेर त्रस्त होऊन, रस्त्यावर उतरले आणि  काँग्रेस नेते ज्ञानेश्वर  मोझे यांच्या नेतृत्वाखाली पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता प्रवीण गेडाम यांना निवेदन देण्यात आले.
अनेक वर्षणापासून संगमवाडी गाव व शहाडावल बाबा परिसरातील  नागरिकांना अनिनियमित पाणी पुरवठा होत आहे, धारण भरली तरी देखील नागरिकांना पाणी संकटाला सामोरे जावा लागत आहे, या परिसराला पाणी पुरवठा  बंड  गार्डन पाणी पुरवठा  विभागाकडून तर याचा मेन्टेन्स चतुःशृंगी पाणी पुरवठा विभागाकडून केला जातो  या दोन्ही विभागातील आपसी वादांमुळे संगमवाडी गाव आणि शाहदवल बाबा परिसराच्या पाणी पुरवठ्याकाडे  दुर्लक्ष  होत असल्याचं येथील रहिवाश्यांच्या सांगितले, अखेर नागरिकांनी कंटाळून महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाला निवेदन दिले.
अधीक्षक  प्रवीण गेडाम यांनी लवकरात लवकर शहादावल बाबा ते संगमवाडी पर्यन्त नवीन १ फुटी पाईपलाईन जोडण्यात  येईल असे आश्वासन दिले तर लवकरात लवकरात पाणी पुरवठा नियमित न केल्यास तीव्र आंदोलन करून असा इशारा नागरिकांनी केला.

सर्वे नं -: ६१, संगमवाडी येथे विदयुत वाहीनी भूमिगत करण्याचा कामाचे भूमिपूजन करताना






सर्वे नं -: ७७, रामनगर संगमवाडी येथे भूमिगत विदयुत तारांचे कामाची पाहणी करताना. मी व परिसरातील नागरीक


मनोगत

आदरणीय माता भगिनी व बंधूना सप्रेम नमस्कार,
मी ज्ञानेश्वर रामभाऊ मोझे, एक सेवाभावी संकल्पना डोळ्यांसमोर ठेवून आपल्या सर्वांच्या विकास कार्यासाठी आगामी काळात चांगले व प्रगतशील काम करू इच्छित आहे.
सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा, उद्योग-व्यवसाय या कामांच्या प्रदीर्घ अनुभवामधून माझ्या सेवाभावी कार्याची जडण घडण झालेली असल्याने मला गोरगरिबांची कामे करताना विशेष आनंद होतो.
माझे शिक्षण (बी. कॉम, एम. सी. एम. पर्यंत) डॉन बास्को हायस्कूल, सेंट व्हिन्सेट हायस्कूल, तसेच वाडिया व सिंबायोसिस कॉलेज मध्ये झाले. माझे आजोबा स्वर्गीय गेनबा सोपानराव मोझे हे १९५७ ते १९७४ पर्यंत पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक होते. त्यांच्यानंतर माझे वडील मा. रामभाऊ मोझे हे १९७४ ते १९८५ पर्यंत नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, होते. सन १९८५ पासून तीन वेळा बोपोडी विधानसभा मतदार संघातून महाराष्ट्र राज्य विधानसभेचे विद्यमान व कार्यक्षम आमदार म्हणून त्यांनी जनतेच्या मनामध्ये उत्तम असा नावलौकिक मिळविलेला आहे.
त्यांच्या राजकीय वाटचालीमध्ये त्यांनी येरवडा आणि बोपोडी परिसरातील अनेक सामाजिक व लोकोपयोगी कामे केलेली आहेत. याचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत.
आपल्या सर्वांचे प्रेम अनेक माता भगिनींचा प्रेमळ आशीर्वाद यांच्यामुळे मला माझ्या सामाजिक व सेवाभावी कार्याला खऱ्या अर्थाने प्रोत्साहन व प्रेरणा लाभते.
पुणे शहर हे विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. ही ओळख कायम ठेवण्यामध्ये माझे आजोबांच्या नावाने माझे वडील मा. आमदार रामभाऊ मोझे यांनी स्थापन केलेली गेनबा सोपानराव मोझे संस्था आजच्या काळात उत्तमोत्तम ज्ञानदानाचे व सक्षम नागरिक घडविण्याचे कार्य करते. हे मला फार अभिमानास्पद वाटते.
सामाजिक व राजकीय कार्याचा परंपरागत वारसा घेऊन मी गेली १५ वर्षे येरवडा, संगमवाडी परिसरातील गोरगरीब, मागासवर्गीय, अल्पसंख्याक व सर्व समाजबांधवांची कामे करणे यालाच मी माझे आद्य कर्तव्य मानतो. तुमच्या सर्वांचे कृपाशीर्वाद व सदिच्छाचे पाठबळ पुढील काळात सदैव माझ्या सोबत राहो. हीच मनोकामना !  
    “गरज तुमच्या साथीची .......
     हीच वेळ प्रभागाच्या विकासाची........”    
आपला नम्रसेवक,
  मा. ज्ञानेश्वर रामभाऊ मोझे