आदरणीय माता भगिनी व बंधूना सप्रेम नमस्कार,
मी ज्ञानेश्वर रामभाऊ मोझे, एक सेवाभावी संकल्पना डोळ्यांसमोर ठेवून आपल्या सर्वांच्या विकास कार्यासाठी आगामी काळात चांगले व प्रगतशील काम करू इच्छित आहे.
सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा, उद्योग-व्यवसाय या कामांच्या प्रदीर्घ अनुभवामधून माझ्या सेवाभावी कार्याची जडण घडण झालेली असल्याने मला गोरगरिबांची कामे करताना विशेष आनंद होतो.
माझे शिक्षण (बी. कॉम, एम. सी. एम. पर्यंत) डॉन बास्को हायस्कूल, सेंट व्हिन्सेट हायस्कूल, तसेच वाडिया व सिंबायोसिस कॉलेज मध्ये झाले. माझे आजोबा स्वर्गीय गेनबा सोपानराव मोझे हे १९५७ ते १९७४ पर्यंत पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक होते. त्यांच्यानंतर माझे वडील मा. रामभाऊ मोझे हे १९७४ ते १९८५ पर्यंत नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, होते. सन १९८५ पासून तीन वेळा बोपोडी विधानसभा मतदार संघातून महाराष्ट्र राज्य विधानसभेचे विद्यमान व कार्यक्षम आमदार म्हणून त्यांनी जनतेच्या मनामध्ये उत्तम असा नावलौकिक मिळविलेला आहे.
त्यांच्या राजकीय वाटचालीमध्ये त्यांनी येरवडा आणि बोपोडी परिसरातील अनेक सामाजिक व लोकोपयोगी कामे केलेली आहेत. याचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत.
आपल्या सर्वांचे प्रेम अनेक माता भगिनींचा प्रेमळ आशीर्वाद यांच्यामुळे मला माझ्या सामाजिक व सेवाभावी कार्याला खऱ्या अर्थाने प्रोत्साहन व प्रेरणा लाभते.
पुणे शहर हे विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. ही ओळख कायम ठेवण्यामध्ये माझे आजोबांच्या नावाने माझे वडील मा. आमदार रामभाऊ मोझे यांनी स्थापन केलेली गेनबा सोपानराव मोझे संस्था आजच्या काळात उत्तमोत्तम ज्ञानदानाचे व सक्षम नागरिक घडविण्याचे कार्य करते. हे मला फार अभिमानास्पद वाटते.
सामाजिक व राजकीय कार्याचा परंपरागत वारसा घेऊन मी गेली १५ वर्षे येरवडा, संगमवाडी परिसरातील गोरगरीब, मागासवर्गीय, अल्पसंख्याक व सर्व समाजबांधवांची कामे करणे यालाच मी माझे आद्य कर्तव्य मानतो. तुमच्या सर्वांचे कृपाशीर्वाद व सदिच्छाचे पाठबळ पुढील काळात सदैव माझ्या सोबत राहो. हीच मनोकामना !
“गरज तुमच्या साथीची .......
हीच वेळ प्रभागाच्या विकासाची........”
आपला नम्रसेवक,
मा. ज्ञानेश्वर रामभाऊ मोझे
No comments:
Post a Comment