पुणे : गेल्या अनेक वर्षांपासून संगमवाडी गाव व शाहदावल बाबा परिसरात अनियमित पाणी पुरवठा होत असल्याने तेथील नागरिकांनी अखेर त्रस्त होऊन, रस्त्यावर उतरले आणि काँग्रेस नेते ज्ञानेश्वर मोझे यांच्या नेतृत्वाखाली पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता प्रवीण गेडाम यांना निवेदन देण्यात आले.
अनेक वर्षणापासून संगमवाडी गाव व शहाडावल बाबा परिसरातील नागरिकांना अनिनियमित पाणी पुरवठा होत आहे, धारण भरली तरी देखील नागरिकांना पाणी संकटाला सामोरे जावा लागत आहे, या परिसराला पाणी पुरवठा बंड गार्डन पाणी पुरवठा विभागाकडून तर याचा मेन्टेन्स चतुःशृंगी पाणी पुरवठा विभागाकडून केला जातो या दोन्ही विभागातील आपसी वादांमुळे संगमवाडी गाव आणि शाहदवल बाबा परिसराच्या पाणी पुरवठ्याकाडे दुर्लक्ष होत असल्याचं येथील रहिवाश्यांच्या सांगितले, अखेर नागरिकांनी कंटाळून महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाला निवेदन दिले.
अधीक्षक प्रवीण गेडाम यांनी लवकरात लवकर शहादावल बाबा ते संगमवाडी पर्यन्त नवीन १ फुटी पाईपलाईन जोडण्यात येईल असे आश्वासन दिले तर लवकरात लवकरात पाणी पुरवठा नियमित न केल्यास तीव्र आंदोलन करून असा इशारा नागरिकांनी केला.
No comments:
Post a Comment